Ladki Bahin Yojana Online Apply 2024 : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन प्रक्रिया, अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात Ladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Online Apply 2024 : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना आपल्या सर्वांना दिसत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र सरकारकडे प्राप्त झाले आहे आणि त्यामधील लाखो महिलांचे खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये खात्यामध्ये जमा पण करण्यात आलेली आहे.

परंतु राज्यातील अनेक अशा लाखो महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केला नाही तर आज आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येईल त्याची संपूर्ण नवीन प्रक्रिया यासंबंधी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
आर्टिकल चे नावLadki Bahin Yojana Online Apply 2024
अंमलबजावणी28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन /ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

Ladki Bahin Yojana Online Apply Eligibility

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे
  • अर्जदार महिला ही 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिला जवळ बँक पासबुक असणे आवश्यक आहे

हे पण वाचा :

Ladki Bahin Yojana Online Apply Document

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, राशन कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्रे 15 वर्ष पूर्ण झालेले
  • महिला जर इतर राज्यातील असेल आणि त्यांचा विवाह महाराष्ट्र राज्याच्या पुरुषासोबत झाला असेल तर त्या संबंधित महिलांच्या पतीचे अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, यापैकी कोणतेही एक कागदपत्रे 15 वर्ष पूर्ण झालेले असावे
  • अर्जदार महिलेचा फोटो
  • हमीपत्र
  • उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड

Ladki Bahin Yojana Offline Apply प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे पण तुमच्या जवळ मोबाईल फोन नाही किंवा तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यासंदर्भात तुम्ही खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही स्वतःचा Offline अर्ज सादर करू शकतात, त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

  • लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेचा अर्ज फॉर्म झेरॉक्स सेंटरवरून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावे
  • आता तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र/महिला व बालकल्याण विभाग या कोणत्याही एका ठिकाणी जाऊन या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज सादर करू शकता
  • वरील कार्यालयाच्या अधिकाऱ्याद्वारा आपले अर्ज योजनेच्या अधिकृत पोर्टल मार्फत ऑनलाईन केले जाईल
  • तुम्ही काही दिवसानंतर कार्यालयाला त्यांना भेट देऊन अर्जाची पावती घेऊ शकता
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

Ladki Bahin Yojana New Registration Form

मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले योजनेच्या पोर्टलची युजर आयडी पासवर्ड तयार करावी लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) जावावे लागेल
  • तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट पोर्टलचा होमपेज ओपन होईल
  • होमपेज वर तुम्हाला वरच्या भागांमध्ये अर्जदार लॉगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल
Ladki Bahin yojana
  • आता तुम्हाला स्वतःची यूजर आयडी पासवर्ड तयार करायचा आहे
  • त्यासाठी तुम्हाला Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल
Ladki Bahin Yojana New Registration Form
  • त्यामध्ये तुम्हाला मागितलेली सर्व माहिती भरून घ्यायचे आहे
  • जर तुम्ही स्वतःचा अर्ज भरणार असाल त्यामध्ये तुम्हाला एथुराईज पर्सनच्या ठिकाणी General Women हे निवडायचा आहे.
  • आता तुम्हाला Accept Terms and condition यावर टीक करून कॅपच्या फील करून घ्यायचा आहे
  • पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थितपणे तपासून Signup ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचा आहे
  • अशा प्रकारे तुमची यूजर आयडी पासवर्ड तयार होईल याचा उपयोग करून या योजनेसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता.

Ladki Bahin Online Apply 2024

  • वरील प्रमाणे तुम्हाला सर्वात पहिले या योजनेच्या पोर्टलची यूजरडी पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे
  • यूजर पासवर्ड तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तयार
  • यूजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यायचा आहे
Ladki Bahin yojana
  • आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलचा डॅशबोर्ड दिसेल
  • त्यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मधील Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Online Apply 2024
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर इंटर करावा लागेल आणि त्यानंतर कॅपच्या फील करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
majhi Ladki Bahin Yojana
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आधार प्रमाणे तुमचे नाव व संपूर्ण पत्ता व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची तपशील भरून घ्यायची आहे
  • आता तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत
Ladki Bahin Yojana
  • सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर जर अर्जामध्ये काही माहिती भरायची शिल्लक राहिली आहे आणि तुम्ही काही वेळानंतर अर्ज भरू इच्छिता तर तुम्ही Save as draft या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा अर्ज सेव करून ठेवू शकता
  • अन्यथा तुम्ही submit ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावे
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर Registration Preview पेज ओपन होईल
  • तुम्ही भरलेली अर्जामध्ये माहिती व्यवस्थितपणे पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे व सर्व माहिती बरोबर असल्यास कॅपच्या फील करून अर्ज सबमिट करून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाईल फोन ने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता .

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

लाडकी बहीण योजना पोर्टल लिंक

https://ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीणयोजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024

लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतो का ?

होय तुम्ही जवळच्या सेतू/अंगणवाडी/ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन आपल्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मोबाईल फोन करू शकतो का ?

होय