Ladki Bahin Yojana Aadhar Link Check : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात, लगेच जमा होतील पैसे

Ladki Bahin Yojana Aadhar Link Check : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा पहिला हप्ता सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु लाखो महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाही तर आज आपण तुमचे खाते आधार लिंक आहे का नाही व आधार लिंक कोणती खाते आहे ( Ladki Bahin Aadhar Link Check ) या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

योजनेचे नावमुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना 2024
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीबपरिवारातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Official Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पैसा सरकार आधार लिंक खात्यामध्ये पाठवत आहे त्यासाठी राज्यातील महिलांना आपले बँक खाते आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे जर महिलाचे खाते आधार लिंक राहणार नाही तर त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा होणार नाही .

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे या वेबसाईटचा उपयोग करून राज्यातील महिला आपले अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात.

या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 ते 31 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेले आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • महिलाची वय हे 21 ते 65 वयोगटातील असावे
  • महिलेजवळ वैयक्तिक बँक पासबुक असणे आवश्यक

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही १ ५ वर्षे पूर्ण झालेले कागदपत्र )
  • हमीपत्र
  • अर्जदार महिलेचे फोटो

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला नाही अन्यथा तुम्ही तुमचे खाते आधार लिंक आहे का नाही हे पाहायचं आहे तर तुम्हाला मी खाली काही स्टेप दिलेले आहे त्यांना फॉलो करून तुम्ही तुमचे बँक खाते कोणत्या बँक ला आधार लिंक आहे ते पाहू शकता.

  • सर्वात पहिले तुम्हाला युआयडीएआय च्या ऑफिशियल वेबसाईटवर ( https://myaadhaar.uidai.gov.in ) जावे लागेल
majhi ladki bahin yojana
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Login हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे.
  • लॉगिन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर व कॅपच्या टाकून Login With OTP या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Aadhar Link Check
  • तुमच्या आधार लिंक मोबाइल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यावे
  • लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला Bank Seeding Status या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
ladki bahin yojana
  • क्लिक केल्यानंतर तुमची खाते कोणत्या बँकेला लिंक आहे त्यांची माहिती तिथे तुम्हाला दिसेल
ladki bahin yojana

अशा प्रकारे तुम्ही तुमचे खाते कोणत्या बँकेला लिंक आहे हे सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here

बँक खाते आधार लिंक चेक कसे करावे ?

बँक खाते आधार लिंक आहे का नाही चेक करण्यासाठी तुम्हाला युआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल https://myaadhaar.uidai.gov.in यासंदर्भात आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला वरी दिलेली आहे

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024

बँक खाते आधार लिंक कसे करावे

बँक खाते आधार लिंक करण्यासाठी ज्या बँकेचे तुमचे खाते आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये तुम्हाला जावे लागेल आणि बँक अधिकारी मार्फत तुम्हाला एक आधार लिंक चा फॉर्म दिला जाणार तो फॉर्म भरून तुम्ही तुमची बँक खाते आधार लिंक करू शकता

बँक खाते आधार लिंक किती दिवसात होते

बँक शाखेमध्ये आधार लिंक फॉर्म जमा केल्यानंतर एक दिवसाच्या आत तुमचे खाते आधार लिंक केले जाते